नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या तालुक्यातील शेतकरी (Farmer) बांधवानी नागली आणि वरई (Nagli and Varai) या पिकांच्या बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाबीज कंपनीकडून (Mahabeez Company) करण्यात आले आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील बिलीप्स ही सामाजिक संस्था महाबीज कंपनीच्या अधिकार्यांना शेतकर्यांशी संवाद साधण्यास आणि नागली व वरई पिकाच्या बिजोत्पादन कार्यक्रमाबद्दल जनजागृतीसाठी सहाय्य करत आहे…
पौष्टिक तृणधान्याच्या (Cereal) प्रमाणात बहुगुणी व आरोग्यदायी नागलीचा पेरा व क्षेत्र सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी हवामान बदल (Climate Change) हे कारण सांगितले जात असले तरी रोग व किडीमुळे राज्यातील बहुतांशी नागली क्षेत्र मोठया प्रमाणात बाधित होत असते. अशावेळी नागली पिकासाठी रोग व किडीला तसेच पावसाच्या (Rain)अनियमितपणाला बळी न पडणार्या वाणांचे बिजोत्पादन ही मुख्य गरज असल्याचे लक्षात आल्याने बिलीप्स सामाजिक संस्थेच्या लक्ष्मीकांत जाधव यांनी महाबीज या शासकीय बिजोत्पादन कंपनीच्या अधिकार्यांसमोर ही समस्या मांडली.
तसेच महाबीजच्या जिल्हाव्यवस्थापक सुर्यवंशी यांनी यासाठी सकारत्मक पावले उचलत वरिष्ठांशी संपर्क साधला. या सर्व प्रयत्नामुळे आणि या पिकांसाठी प्रमाणित बियाण्याची गरज विचारात घेऊन शासनाच्या निर्देशनानुसार महाबीजद्वारे खरीप हंगामात राबविण्यात येत असलेल्या नागली आणि वरईचा बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
दरम्यान, यानंतर उत्पादित नागली व वरई पिकांच्या वाणाच्या बियाण्यासाठी आकर्षक खरेदी धोरण ठरविण्यात आले असून नागली व वरई बिजोउत्पादनासाठी एका गावात कमीत कमी एकर क्षेत्राचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ३ जूनच्या अगोदर महाबीजच्या जिल्हा कार्यालयाशी अथवा बिलीप्स संस्थेशी संपर्क साधावा.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..
हवामानातील बदल, रोग व किडीला बळी पडणे आणी सुधारीत तंत्र न वापरणे यामुळे नागली उत्पादन कमी येते आणि परवडत नाही म्हणून नाचणीचे क्षेत्र कमी होते हे शेतकर्यांशी बोलतांना लक्षात येत आहे. चांगले दर्जेदार बियाणे उपलब्धच नसणे हा नागली पिकांची शोकांतिका होती. यासाठी आम्ही शासन दरबारी जो पाठपुरावा करत होतो त्याला यश आले याचे समाधान आहे.
लक्ष्मीकांत जाधव, बिलीप्स सामाजिक संस्था
नागली व वरई पिकांसाठीच्या अनेक सुधारीत जाती निर्माण होत असून सद्या बिजोत्पादनासाठी उपलब्ध बियाणे हे सरळ वाण आहेत. शेतकर्यांना फायदा होईल यासाठी महाबीज कंपनी नागली व वरई पिकांच्या बियाणे निर्मितीसाठी अधिक प्रयत्न करत आहे. नागली व वरई बिजोत्पादन कार्यक्रमात भाग घेतल्यास शेतकर्यांना बाजारभावापेक्षा जास्तीचा खरेदी दर आणि खरेदीची हमी मिळेल.
छबीलाल सूर्यवंशी, जिल्हा व्यवस्थापक महाबीज