Saturday, October 3, 2026
Homeक्राईमCrime News : आदिवासी तरूणीवर दोघांकडून अत्याचार

Crime News : आदिवासी तरूणीवर दोघांकडून अत्याचार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्याच्या पठार भागात एका 26 वर्षीय आदिवासी तरुणीवर दोघांनी अत्याचार केला आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पठार भागातील पाणीपुरी विक्रेता गणेश प्रजापती याने घरी साफसफाईचे काम करण्यास 26 वर्षीय आदिवासी पीडित तरुणीला बोलावून घेतले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. यावरच तो थांबला नाही तर बेकरीवाला सैफुल्ला अबुतय्यब शेख याला देखील फोन करून बोलावून घेतले. त्यानेही पीडितेवर अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अत्याचारासह अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करत आहे. तर आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी पथके रवाना केली आहे.

ताज्या बातम्या