Sunday, October 13, 2024
Homeनाशिकआदिवासी विद्यार्थ्यांनी घेतला 'चांद्रयान - ३' च्या प्रक्षेपणाचा अनुभव

आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतला ‘चांद्रयान – ३’ च्या प्रक्षेपणाचा अनुभव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण असणाऱ्या चांद्रयान ३ (Chandrayaan 3) चे आज आंध्रप्रदेशमधील (Andhra Pradesh) श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून यशस्वीपणे प्रक्षेपण झाले. हे प्रक्षेपण कसे होते, चांद्रयान नेमके काय आहे. तसेच त्याबद्दलची सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी शासकीय, अनुदानित तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळा याठिकाणी जेथे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल, स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून चांद्रयान या उपग्रहाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले…

- Advertisement -

Chandrayaan 3 : भारताची भरारी! ‘चांद्रयान -३’ ची अवकाशात ऐतिहासिक झेप

आदिवासी विकास आयुक्तालया (Tribal Development Commissionerate) अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता कक्ष प्रकल्प कार्यालयात कार्यरत आहे. या गुणवत्ता कक्षाच्या शैक्षणिक राज्य समन्वयक म्हणून अमृता भालेराव या कामकाज बघतात. विद्यार्थ्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या (Education) दृष्टीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण राज्यात राबविले जातात. सभोवताली घडणाऱ्या बाबी विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक आहे.

मोठी बातमी! महायुतीचे खातेवाटप जाहीर; भुसेंना बढती, भुजबळांना मिळालं ‘हे’ खातं

शहरी भागात हे शक्य आहे, परंतु आदिवासी तसेच ग्रामीण भागात विद्यार्थ्यापर्यंत (Student) विविध बाबी पोहोचण्यासाठी अडचणी येतात. शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून आज ज्या-ज्या शाळांमध्ये इंटरनेट सुविधा आहेत, त्याठिकाणी इस्रोच्या (ISRO) संकेतस्थळावरील चांद्रयानचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर योग्यप्रकारे केला तर विद्यार्थी शिक्षणास त्याची मदत होते हे यामधून सिद्ध होते.

Ajit Pawar : नवीन मंत्र्यांचे खातेवाटप कधी? अजित पवार म्हणाले, यादी…

आज अनेक ठिकाणी आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना चांद्रयान ३ चे प्रक्षेपण दाखविण्यात आले. गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून राबविल्या गेलेल्या या उपक्रमामुळे मुलांना चांद्रयान प्रक्षेपण कसे होते याचा अनुभव दृश्य स्वरुपात घेता आला. सर्व राज्यातून येणारे फोटो पाहिले की मुलांचा आनंद बघून समाधान वाटते.

विनीता सोनवणे, उपायुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय

आमच्या मुलांनी चांद्रयान ३ च्या उड्डाणाचे साक्षीदार व्हावे या भावनेतून ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा आहे तेथे दुपारी २ वाजता प्रक्षेपण दाखवावे याबद्दल सांगितले होते. विभागातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान प्रक्षेपणाचा अनुभव दिला, त्याबद्दल शैक्षणिक गुणवत्ता कक्ष आणि सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन.

नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या