Saturday, June 14, 2025
Homeनाशिकआदिवासींची पाणीटंचाई घटणार

आदिवासींची पाणीटंचाई घटणार

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

- Advertisement -

जलजीवन मिशन (jaljeevan mission) योजनेंतर्गत सिन्नर विधानसभा मतदारसंघातील (Sinnar Assembly constituency) आंबेवाडी व 8 गाव नळ पाणीपुरवठा योजनेस (Water supply scheme) आमदार माणिकराव कोकाटे (mla manikrao kokate) यांच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली असून

त्यासाठी 19 कोटींचा निधी (fund) प्राप्त झाला आहे. आदिवासी भागातील (tribal area) या गावांना भाम धरणातून थेट पाणी पुरवठा (Water supply) होणार असल्याने सुमारे 25 हजार आदिवासी बांधवांची (tribal community) कायमस्वरूपी पाणी टंचाईतून (Water scarcity) मुक्तता होणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील (igatpuri taluka) टाकेद गटात असणारी आंबेगावसह 8 गावे सिन्नर विधानसभा मतदारसंघात येतात. आदिवासी भागात असल्याने या गावांना पाणीपुरवठा योजनांसाठी (Water supply scheme) अनेकदा निधी मिळाला. मात्र, पाण्याचे स्त्रोत शाश्वत नसल्याने जानेवारी महिन्यापासून या भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. महिला दीड ते दोन किलोमीटर डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी पायपीट करतात.

पुरुष मोटारसायकल, बैलगाडी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाणी वाहून आणतात. त्यामूळे आ. कोकाटे यांनी आदिवासी बांधवांची (tribal community) तहान भागविण्यासाठी सिन्नर नगर परिषदेच्या (sinnar nagar parishad) धर्तीवर या गावांनाही थेट धरणातून पाणी पुरवठा (Water supply) करण्यासाठी भाम धरणातून प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्याचे ठरविले. त्यासाठी जलसंपदा विभागातून (Department of Water Resources) पाणी आरक्षण (Water reservation) करून घेतले.

जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांकडून तसा सर्व्हे करून घेतला. त्यानंतर प्रस्ताव तयार करून घेत मंत्रालयात सादर करण्यात आला. या प्रस्तावास नुकतीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांनी मंजुरी दिली. 19 कोटी 4 लाखांच्या या योजनेचे काम ई-निविदा प्रक्रिया (E-tendering process) पूर्ण करुन लवकरच सुरु होणार आहे.

सौर उर्जेतून योजना

9 गावे व त्या गावांच्या 30 वाड्या यांना सुमारे –किमीच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा होणार आहे. भाम धरणातून पाणी मोटरपंपद्वारे उचलून 8 किमी अंतरावर मांजरगाव येथे बांधण्यात येणार्‍या जलशुध्दीकरण केंद्रावर सोडण्यात येणार आहे. पाणी उपसा व जलशुध्दीकरण यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज लागणार आहे. त्यासाठी आ. कोकाटे यांच्या सूचनेवरून या योजनेत सौर उर्जा संचाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वीजबिलाच्या आर्थिक बोजातून ही योजना वाचणार आहे.

लाभार्थी गावे

आंबेवाडी, मांजरगाव, इंदोरे, खडकेद, वासाळी, बारशिंगवे, सोनोशी, मायदरा व आधारवड या गावांसह भामलेवाडी, धानोशी, ठोकळवाडी, घोडेवाडी, काननवाडी, कचरवाडी, राहुलनगर, भोईरवाडी व शिरेवाडी या वाड्यांनाही योजना पूर्ण होताच पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे.

हालअपेष्टा थांबविणार धरणांचा तालुका असूनही वर्षातील 6 महिने पाण्यासाठी हाल सोसणार्‍या आदिवासी बांधवांची यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी त्यावर उपाययोजना करतांना शाश्वत पाण्याचा स्त्रोत महत्वाचा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे भाम धरणातून या योजनेच्या पाण्याचा उद्भव मंजूर करून घेतला. आता योजना पूर्ण होताच 12 ही महिने आदिवासी बांधवांना त्यांच्या घरात पाणी मिळणार आहे.

– माणिकराव कोकाटे, आमदार

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘चरणसेवा’

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि...