Sunday, April 6, 2025
Homeक्राईमCrime News : आदिवासी महिलेच्या घरात घुसून मारहाण, तोडफोड, जातीवाचक शिवीगाळ व...

Crime News : आदिवासी महिलेच्या घरात घुसून मारहाण, तोडफोड, जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करून जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी 19 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी, पोस्को, दरोडा यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत 35 वर्षीय आदिवासी कुटुंबातील विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, 26 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गावात कोठे तरी वाद झाल्यामुळे तेथे जमलेल्या काही लोकांनी मी माझ्या राहत्या घरातील किचन मध्ये स्वयंपाक करीत असताना आमच्या घरावर दगड फेकले. दगड फेकल्याचा आवाज आल्याने मी स्वयंपाकघरातून बाहेर आले, त्यावेळी आरोपींनी आमच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली.

- Advertisement -

त्यावेळी सुधीर टिक्कल व मंगेश ढुस या दोघांनी माझ्या अंगाला झटुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. माझ्या 13 वर्षीय मुलीला देखील लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून मारहाण केली. तसेच घरासमोर लावलेल्या चारचाकी व दुचाकींची इतर साहित्याची तोडफोड करून घरातील 1 हजार 250 रुपये रोख रक्कम चोरुन गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे डोरले बळजबरीने सुधीर टिक्कल याने तोडुन नेले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरून मंगेश ढुस, सुधीर टिक्कल, पप्पू कदम, बापू कदम, अभिजित विश्वास कदम, दादा गडाख, किशोर गडाख, सतिष वाकळे, रुपेश कुर्‍हे, पिनू चव्हाण, बाल्या चहावाला, रवि चहावाला, ओंकार मुसमाडे, वैभव चव्हाण, अशोक मुसमाडे, विकी वाळके, महाकास मेजर यांचा मुलगा, अशोक निर्मळ, हिरामन ढुस या 19 जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 74, 115 (2), 118 (1), 189 (2), 190, 191 (1), 324 (4), 352, 351 (2) तसेच अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 3 (1) (आर), 3 (1) (एस), 3 (1) (डब्लू) (आय) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कलम 3 (2), 3 (व्ही), 8, 12 प्रमाणे मारहाण, तोडफोड, विनयभंग, पोस्को व अ‍ॅट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे हे करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

खासगी इसम रंगेहाथ लाच घेताना अटकेत

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर युनिटने सापळा कारवाई करत एका खासगी इसमाला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. संशयित आरोपीने शेवगाव- पाथर्डी उपविभागीय...