Saturday, May 4, 2024
Homeनाशिकआदिवासी दिन विशेष : आदिवासी तरुणांना स्पर्धा परीक्षांची गोडी

आदिवासी दिन विशेष : आदिवासी तरुणांना स्पर्धा परीक्षांची गोडी

दिंडोरी | नितीन गांगुर्डे

आदिवासी समाजात (Tribal Community) आता बदल होताना दिसत आहे. आर्थिक, शैक्षणिक, आरोग्याचे मागासलेपण सोडून उच्च शिक्षण (Higher Education) घेतलेल्या आदिवासी युवकांनी केंद्र आणि राज्यसेवेची परीक्षा (Competitive Exams) देवून प्रशासनात संधी मिळवली आहे. त्यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून ख्याती निर्माण झाली आहे. त्यांंच्या पावलावर पाऊल ठेवून आदिवासींची नवीन पिढी स्पर्धा परीक्षा देत आहे. यशस्वी होऊन प्रशासनात महत्वाच्या पदांवर जबाबदारी सांंभाळत आहे…

- Advertisement -

दिंडोरी (Dindori), पेठ (Peth), सुरगाणा (Surgana), कळवण (Kalwan), इगतपुरी (Igatpuri), त्र्यंंबकेश्वर (Trimbakeshwer) या आदिवासी बहुल भागातील युवक केंद्रिय लोकसेवा (UPSC) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होवून आदिवासींची पताका डौलाने फडकावत आहेत. दुर्गम आदिवासी भागातील युवक सोशल मीडियामुळे (Social Media) जागृत झाला आहे.

अर्थसंकल्पात आदिवासींना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षणावर मोठी तरतुद होते. एवढेच नव्हे तर आदिवासी विकास विभाग (Tribal Development Department) हे स्वतंत्र मिनी मंत्रालयच (Mini Mantralay) नाशिकमध्ये आहे. त्यामुळे आपल्यावर होणार्‍या तरतुदींचा उपयोग योजनांच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्याची जाणीव आदिवासी युवकांना (Tribal Youth) झाली आहे. त्यामुळे हे युवक आता शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना आपल्या हक्काचा जाब विचारू लागले आहेत.

एकीकडे जागृती होत असताना दुसरीकडे प्रशासकीय व्यवस्थेत अधिकारी होण्याचा टक्काही वाढला आहे. त्यापैकीच एक असलेले डॉ. योगेश भरसठ हे आयएएस होऊन उच्च पदभार सांभाळत आहेत. पेठ तालुक्यातील फणसपाडा हे त्यांचे गाव. प्रबळ महत्त्वाकाक्षांच्या आधारे त्यांनी यश मिळवले आहे.

आदिवासी युवकांसाठी प्रेरणा बनले आहेत. मध्य प्रदेश येथे ते सेवा बजावत आहेत. तालुक्यातील आंंबे दिंडोरी येथील राजू नामदेव वाघ दिल्ली येथे सहायक अधिक्षक पदावर काम करत आहे. खुंटीचा पाडा येथील हिरामण झिरवाळ उपजिल्हाधिकारी नव्या पिढीला प्रेरणादायी ठरले आहेत. ननाशीचे रहिवासी असलेले चौधरी मंत्रालयात अप्पर सचिव म्हणून काम पाहत आहे.

चंद्रकांत खांंडवी अतिरिक्त पोलीस अधीक्षक झाले आहेत. विजय भोये डेप्युटी वाहन निरीक्षक आहे. जनार्दन खोटरे व बळवंत गायकवाड वित्त व लेखाधिकारी म्हणून कार्यरत झाले आहेत. माधव थैल लेखा अधिकारी म्हणून काम करीत आहे. प्रकाश थविल आणि स्वाती थविल उपजिल्हाधिकारी झाले. दत्ता बोरसे नायब तहसीलदार झाले आहेत. अविनाश गांगोडे वन विभागाचे अधिकारी झाले आहेत.

हे अधिकारी सेवा बजावत असताना समाजाप्रती योगदान देत असतात. पोलिस, सैनिक दलात तर आदिवासी युवकांचा टक्का वाढला आहेच पण, आरोग्य क्षेत्रात नर्सिंग कोर्स करून आदिवासी मुलींनीही (Tribal Girls) उत्कृष्ट परिचारिकेची ओळख निर्माण केलेली आहे.

युवकांना प्रशिक्षण देण्यासार्ठीे देविदास कामडी पोलिस प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आदिवासी भागातील सार्वजनिक वाचनालये युवकांना महत्वाचे ठरत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या