लखमापूर । बंडू खडांगळे Lakhmapur
शहरी भागात व ग्रामीण भागात वर्षातील पहिला सण म्हणून मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरा करण्याची प्रथा आहे. यासाठी पतंंग हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. परंतू आतापर्यंत पतंगाच्या मांज्यापासून अनेक अपघात आपणाला पहायला मिळतात. त्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी दुचाकीवर असताना मांजापासून वाचण्यासाठी आपल्या मोटारसायकला तार लावण्याचा देशी जुगाड करुन अनेकांना दिलासा दिला आहे.
12 महिन्यातील एक महत्त्वाचा महिना म्हणून जानेवारी महिन्याकडे पाहिले जाते. या महिन्यात वर्षातील पहिला सण हा 14 जानेवारीला नेहमीच येतो. तो म्हणजे मकरसंक्रांत होय. हा सण ग्रामीण व शहरी भागामध्ये प्रत्येकाचे गोड तोंड करुन व गोड तिळगुळ वाटप करुन साजरा करण्याचे अनेक वर्षांची परंपरा आहे. याचा आधार अनेक धार्मिक ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. प्रत्येक भागामध्ये हा सण नागरिक आपल्या पारंपारिक पध्दतीने साजरा करतात. परंतू नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये हा सण आकाशामध्ये पतंग उडवून साजरा केला जातो.
हा सण अनेकांना गोड वातावरण निर्माण करुन देतो तर काहींना हा सण दवाखाना दाखवतो. कारण अनेकांचे पतंगाच्या मांजामुळे आतापर्यंत लहानमोठे अपघात झालेले आहेत. कारण पतंग उडवतांना अनेक ठिकाणी नागरिक नायलॉनचा मांजा वापरतात. त्यामुळे आकाशामध्ये पतंग उंचावर गेल्यानंतर प्रतिस्पर्धी हा पतंग आकाशामध्ये दुसर्या मांजाने तोडतात. परिणामी हा पंतंगाचा धागा नायलॉनचा असल्यामुळे तो मांजा छोट्या मोठ्या वाहनांना अटकतो व त्यामुळे आतापर्यंत मोटारसायकलधारक चालकांचे गळे चिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र काही मागील इतिहास सांगतो.
आतापर्यंत अनेकांनी या मांजावरती बंदी आणावी, अशी मागणी केली आहेत. परंतू लोक शासकीय आदेशाला न जुमवता पतंग उडवण्यासाठी घातक स्वरुपाचे मांजा वापरतात. परिणामी पतंग उडवतांना असे भयानक अपघात होवून काहींना कायमस्वरुपी अपंगत्व निर्माण झाले आहे. मध्यतरी काळखंडामध्ये शासनाने नायलॉनच्या धाग्यांवर मोठ्या प्रमाणावर बंदी घातली होती. काही काळ या आदेशाचे पालन नागरिकांमधून केले गेले परंतू आता अनेक ठिकाणी शासकीय आदेशाला धाब्यावर ठेवून आता परत अनेक ठिकाणी नायलॉनचे घातक मांजा वापर नागरिकांमधून केला जात असल्याने मंकरसंक्रांतीला गोड तोंड करण्याऐवजी दवाखान्याच्या कडू गोळ्या घ्यावे लागतात, याला जबाबदार फक्त नागरिकच आहे.
हॅन्डलला लोखंडी तार
ग्रामीण व शहरी भागामध्ये पतंगाच्या मांज्यापासून गळे चिरण्याचे प्रमाण होवू नये, यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी एका देशी जुगाडची निर्मित्ती केली आहे. ती अशी की आपल्या मोटारसायकलच्या हॅडेला गोलाकार तार करुन फिटींग करतात. त्याची उंची चालकाच्या डोक्याच्या वर असते. जरी मांजा पुढून आडवा आला तर त्या लोखंडी गोलाकार तारीला अडकतो. त्यामुळे वाहनधारकाचा गळा हा सुरक्षित राहतो. सध्या ग्रामीण भागामध्ये मांज्यापासून वाचवण्यासाठी नागरिकांनी हे देशी जुगाड मोठ्या प्रमाणात केल्यामुळे अनेकांनी अपघातापासून अनेकांची आता सुटका होईल, हा महत्त्वाचा शब्द नागरिकांच्या मुखातून निघत आहे. त्यामुळे सध्या अनेक मोटारसायकलांना हे देशी जुगाड नागरिकांच्या नजरेस येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा