Tuesday, September 8, 2026
HomeनाशिकTrimbakeshwar Accident News : कार-दुचाकीचा भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक...

Trimbakeshwar Accident News : कार-दुचाकीचा भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

तालुक्यातील अंबोली-वेळुंजे रस्त्यावरील (Amboli-Welunje Road) मोहनबाबा हागोटे वस्ती परिसरात शनिवारी रात्री ८:१५ वाजता कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार संदीप काशिनाथ उघडे (वय २२) याचा जागीच मृत्यू (Death) झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इको वाहन (क्रमांक MH 15 JS 2124) आणि पल्सर मोटरसायकल (क्रमांक MH 15 JP 2268) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघाताची (Accident) तीव्रता एवढी भीषण होती की, संदीपचा जागीच मृत्यू झाला.

देशदूतच्या व्हाट्सॲप चॅनेलला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी इको चालक महेंद्र काशीद याच्याविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा (क्र. 151/2026) नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(a)(b), ३२४(४)(५) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

तपास सुरु

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पीआय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वाहनांचा वेग आणि अपघाताचे अचूक कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्या