Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यात्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले

त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

ज्योतिर्लिंग श्री त्र्यंंबकेश्वर मंदिरतील ( Trimbakeshwar Temple )अतिप्राचीन ज्योतिर्लिंगाचे संवर्धन व मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी दि. 5 जानेवारीपासून ते 12 जानेवारीपर्यंत पुरातत्व विभागाने बंद केले होते.

- Advertisement -

15 दिवसांच्या दरम्यान भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत शिवलिंगावर वज्रलेपन करण्यात आले आहे. तसेच गर्भगृहास चांदीचे दरवाजे बसविण्यात आले आहेत. सदर दरवाजे शिवभक्ताने ट्रस्टला दिलेले होते . दरवाजांची किंमत पंचवीस लाख असल्याचे समजते. सभामंडपातील दर्शनरांगेसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग्ज काढून स्टेनलेस स्टीलच्या रेलिंग्ज बसविण्यात आल्या आहेत.

सदरची विकासकामे ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी व विश्वस्त मंडळाच्या नेतृत्वाखाली व पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने गर्भ गृहातील महादेवाच्या पिंडीस करण्यात आल्याचा दावा ट्रस्ट मंडळाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान पहाटे श्री त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा चेअरमन व विश्वस्त यांचे उपस्थित होईल. मंदिर आज पासून(दि.13) भाविकांसाठी सकाळी 7 वाजेपासून खुले करण्यात येणार आहे.

हर्ष महाल दररोज उघडणार

मदिराच्या सभामंडपात असलेला हर्षमहाल दर्शनासाठी दररोज उघडा ठेवण्यात येणार आहे. दररोज रात्री शयनारती झाल्यानंतर भगवान त्र्यंबकराज शयनासाठी हर्षमहालात येतात अशी परंपरा आहे. हा हर्षमहाल म्हणजे सिसम आणि सागवानी लाकडावर केलेल्या अप्रतिम कलाकुसरीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्याचेही पून:सौंदर्यकरण आणि नूतनीकरण केले आहे.तो भाविकांना वर्षातून तीन वेळाच भाविकांना पाहता येत होता, आता तो भाविकांना दररोज दर्शनासाठी खुला करण्यात येत आहे. हर्ष महालला स्थानिक लोक आरसेमहाल असे म्हणतात. भाविकांना याचे दर्शन होणार आहे. नवीन वर्षात भाविकांना हे दर्शन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या