Wednesday, September 30, 2026
HomeनाशिकNashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर देवस्थान राबविणार 'ब्रेक दर्शन' योजना; भाविकांना मोजावे...

Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर देवस्थान राबविणार ‘ब्रेक दर्शन’ योजना; भाविकांना मोजावे लागणार अडीच हजार

पाच मिनिटात दर्शन होणार

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

भाविकांना त्र्यंबकेश्वर दर्शनाचे (Trimbakeshwar Temple) तीन हजार रुपये घेऊन दर्शन घडवणारा प्रकार ताजा असताना आता त्र्यंबकेश्वर देवस्थाननेच ब्रेक दर्शन योजना (Break Darshan Yojana) राबवून भाविकांना अडीच हजार रुपयांचे तिकीट देवून पाच मिनिटात दर्शन घडवणार आहे. रोज पाचशे भाविकांना ब्रेक दर्शन सुविधे अंतर्गत असे दर्शन घेता येणार आहे.

- Advertisement -

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी दर्शन तिकिटाचा (Ticket) काळा बाजार थांबवण्यासाठी अशी ब्रेक दर्शन योजना सुरू करण्याची योजना आखली असून लवकरच ही योजना सुरू होणार असल्याचे समजते. असे असले तरी दोनशे रुपयांचे देणगी दर्शन देखील सुरू राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर धर्मदर्शन मोफत रांगेत व दोनशे रुपये देणगी दर्शन रांगेत भाविकांची (Devotees) मोठी गर्दी असते. धर्मदर्शन रांगेला जास्त वेळ लागतो.

वरील दोन्ही रांगांचा त्र्यंबकेश्वराच्या मुख्य मंदिरात संगम होतो. अडीच हजाराचे तिकीट घेणाऱ्या दर्शनार्थीला या दोन्हीचा संगम होणारी रांग थांबवून ब्रेक देऊन दर्शन घडवण्यात येईल. ही रांग पाच मिनिटांसाठी थांबेल. तिकीट घेऊन दर्शन घेतलेले भाविक आठ मिनिटात बाहेर पडतील. यासाठी स्वतंत्र काउंटर उघडले जाणार आहे. ही योजना कशा पद्धतीने सुरू होते याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...