Saturday, May 4, 2024
Homeनाशिकत्र्यंबकराजाचे आता मिळणार ऑनलाइन दर्शन

त्र्यंबकराजाचे आता मिळणार ऑनलाइन दर्शन

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे उद्यापासून (दि.१०) त्र्यंबक राजाचे भाविकांना थेट दर्शन घेता येणार आहे. म्हणजेच उद्यापासून ऑनलाईन दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. अशी माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

सध्या करोना विषाणूमुळे भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. भाविकांना दर्शन बंद केले असले तरी, त्र्यंबक राजाचे नित्योपचार परंपरेनुसार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन दर्शनाची सोया व्हावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करीत हा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे उद्यापासून भाविकांना आता २४ तास ऑनलाईन दर्शन घेता येणार असून त्यासाठी www.trimbakeshwertrust.com या संकेतस्थळाला भेट द्या अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या