Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर सलग 41 तास खुलं राहणार

महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर सलग 41 तास खुलं राहणार

उत्सव काळात व्हीआयपी, देणगी दर्शन बंद

त्र्यंबकेश्वर | मोहन कानकाटे Trimbakeshwar

- Advertisement -

महाशिवरात्री निमित्त् त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रविवारी पहाटे चार वाजेपासून ते सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत असे सुमारे ४१ तास त्र्यंबक मंदिर उघडे राहणार आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला ’बम बम भोले’च्या जयघोषाने त्र्यंबकनगरी दणाणणार आहे. उत्सव काळात देणगी दर्शन, व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे.

यंदा महाशिवरात्रीच्या अनुषंगाने अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून वेळेत बदल करण्यात आले आहेत.त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी पूर्व दरवाजा दर्शनबारी येथून प्रवेश देण्यात येईल. १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत मंदिर उघडल्यापासून सकाळी साडेदहापर्यंत त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक भाविकांना पश्चिम दरवाजातून आधारकार्ड दाखवून मंदिराच्या पश्चिम दरवाजातून प्रवेश करता येणार आहे. तसेच दर्शन झाल्यावर मंदिराच्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे भाविकांनी देवस्थानास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

देवस्थानच्या वतीने त्र्यंबकराज मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार, उत्तर आणि पूर्व महाद्वार आदी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. देवस्थानच्या वतीने मंदिराच्या आवारात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवारी ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा ’गीतरामायण’ कार्यक्रम झाला. महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मेळा बसस्थानकातून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीला कार्यक्रम
महाशिवरात्रीच्या दिवशी ज्योर्तिलिंगावर अभिषेक, दुपारी तीन वाजता श्री त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक. तीर्थराज कुशावर्त येथे विधिवत पूजा, रात्री मंदिरात पुन्हा महापूजा होईल. पालखी सोहळ्यादरम्यान ’शिव तांडव ग्रुप’तर्फे अघोर नृत्या सादरीकरण मंदिर पटांगणात होणार आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...