Friday, May 16, 2025
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर ते पंंढरपूर आषाढी वारी वेळापत्रक जाहीर

त्र्यंबकेश्वर ते पंंढरपूर आषाढी वारी वेळापत्रक जाहीर

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

- Advertisement -

संत निवृत्तिनाथ महाराज (Saint Nivruttinath Maharaj ) समाधी मंदिर विश्वस्तांनी अपरा एकादशीच्या मुहूर्तावर आषाढी वारीचे वेळापत्रक (Ashadhi Wari schedule) जाहीर केले. 27 दिवसांत वारकरी त्र्यंबकहून पंंढरपूरला पोहोचतील. दिंडी पायी वाटचालीत जी गावे येतात त्यांना वारीचे वेळापत्रक पूर्वीच रवाना झाले आहे.

संत निवृत्तिनाथ महाराज दिंडी चांदीच्या रथासह 13 जूनला पंढरपूरकडे निघणार आहे. गत दोन वर्षे करोनाकाळात पायी वारी झाली. नाही तर शिवशाही बसने पालखी पंढरपूरला गेली होती.आता पायी वारी होणार असल्याने वारकरी यंदा पायी जाणारच, अशी प्रतिक्रिया वारकरी देत आहेत.

त्र्यंंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास 450 किलामीटर आहे. पालखी जाऊन-येऊन मिळून 49 दिवसांचा कालावधी आहे. रोज दिवसा साधारण वीस किलोमीटर पायी प्रवास केला जातो. रात्री निहीत ठिकाणी मुक्काम करून दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते. 9 जुलैला पालखी पंढरपुरात पोहोचेल. 10 जुलैला रविवारी आषाढी वारी आहे. चार मुक्काम पंढरपूर करून पालखी परतीचा मार्ग धरेल. त्र्यंबकेश्वरकडे परत निघेल. 18 दिवसांचा पायी प्रवास करून 30 जुलैला पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परतेल.

चांदीच्या रथात निवृत्तिनाथांची पालखी असते, पादुका असतात. त्र्यंबकपासून पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत ठिकठिकाणच्या दिंड्या मिळून वारकरी भाविकांची संख्या तीस ते पस्तीस हजार होते. यावर्षी गर्दीत मोठी वाढ होईल, असे दिसत आहे. नाशिकमधील मानाच्या पंचवीस दिंड्या, विणेकरी यात सहभागी होणार आहेत.

पायी दिंडींचा प्रवास मार्ग

त्र्यंबकेश्वर, सातपूर, नाशिक, (पंचवटी), पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...