Thursday, March 13, 2025
Homeनाशिक'ट्रिपोली' ट्रॅव्हल कंपनीची नाशिकला शाखा

‘ट्रिपोली’ ट्रॅव्हल कंपनीची नाशिकला शाखा

नाशिक | प्रतिनिधी
पर्यटन क्षेत्रात १२ वर्षांपासून ठसा उमटवणारी ‘ट्रिपोली ट्रॅव्हल कंपनी’ आपला विस्तार करण्यासाठी नाशिकमध्ये शाखा सुरू करणार आहे. महात्मानागर येथे सुरू होणाऱ्या नूतन आणि नाशिकमधील पहिल्या शाखेचे उद्घाटन (दि.२४) होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कंपनीचे संचालक मीत देसाई, अनिल चंदवानी, बिझनेस हेड अस्मिता देसाई व नाशिक शाखा व्यवस्थापक मंदार शास्त्री यांनी दिली. मॉर्निंग स्टार ट्रॅव्हल्स प्रा. लि. अंतर्गत कार्यरत आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ग्रुप टूर्स, कस्टमाईज्ड टूर पॅकेजेस, कॉर्पोरेट टूर्स, व्हिसा सहाय्य, फ्लाईट बुकिंग, हॉटेल रिझर्वेशन आणि लक्झरी ट्रॅव्हल यांसारख्या सेवा देत आहे. कंपनीचे मुख्यालय ठाणे येथे असून सुरत येथेही शाखा आहे. आजच्या ऑनलाइन युगात, उत्तम डील्सच्या नादात पर्यंतकंचर अनेकदा गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते आणि कधी कधी चुकीच्या अनुभवांना सामोरे जावे लागते. या समस्येचे उत्तर म्हणून, नाशिककरांसाठी विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्यटन सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रिपोली ट्रॅव्हल कंपनीने महात्मानगर, नाशिक येथे आपली नवीन शाखा सुरू केली असल्याचे मंदार शास्त्री यांनी सांगितले.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...