Tuesday, March 25, 2025
Homeनगरट्रकच्या धडकेतील ‘त्या’ गंभीर जखमीचा मृत्यू

ट्रकच्या धडकेतील ‘त्या’ गंभीर जखमीचा मृत्यू

सोनई पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

रविवारी सायंकाळी गणेशवाडी ते सोनई रोडवर ट्रकने मोटारसायकलला धडक (Truck and Bike Accident) दिल्याने झालेल्या अपघातात सुनेचा मृत्यू (Death) झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सासर्‍यांचाही उपचार सुरु असताना मृत्यू (Death) झाला. दरम्यान या अपघातप्रकरणी ट्रकचालकावर काल अपघातासह दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की ट्रक (एमएच 16 एवाय 7079) ही सोनईच्या दिशेने भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जात असताना समोरून येणार्‍या दुचाकीला (एमएच 16 जी 6912) हीस समोरून जोराची धडक (Hit) दिली. मोटारसायकलवरील शिला गणेश पालवे यांचा जागीच मृत्यू (Death) झाला होता. तर त्यांचे सासरे राधाकिसन सोन्याबापू पालवे हे गंभीर जखमी (Injured) झाल्याने त्यांना नगरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना ते मयत झाले.

ट्रकने धडक देवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी विक्रम राधाकिसन तांदळे (वय 44) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) गुन्हा र. नं. 352/2024 बीएनएस चे 106, 281, 125 (अ), 125 (ब), मो. वा. का. कलम 184, 134(अ)(ब), 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री. राख हे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...