Sunday, September 6, 2026
HomeनगरAccident News : ट्रक व दुचाकीचा अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident News : ट्रक व दुचाकीचा अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

- Advertisement -

शहरालगत असलेल्या साई कॉर्नर येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात (Truck and Bike Accident) होऊन दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) अशोक भवार (रा. शिंगवे, ता. राहाता) यांचा जागीच मृत्यू झाला. अशोक भवर हे मुलाच्या महाविद्यालयीन कामासाठी कोपरगाव येथे आले होते. काम आटोपून ते घरी शिंगवे येथे जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. या अपघातामुळे (Accident) साई कॉर्नर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. फरार ट्रक चालकाचा शोध घेण्यासह अपघाताचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस (Kopargaon Police) करत आहेत यावेळी संतप्त नागरिकानी काही काळ महामार्ग अडवत संताप व्यक्त केला. शहर पोलिसांनी घटनास्थळी येत नागरिकांची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली.

ताज्या बातम्या

Video : वैभव सूर्यवंशी-तिलक वर्मा यांच्यात मैदानावर शाब्दिक बाचाबाची; अंपायरला करावी...

0
चेन्नई | Chennai चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एक नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. ईस्ट झोनचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि...