इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
घोटी-सिन्नर महामार्गावरील (Ghoti-Sinnar Highway) धामणगाव (Dhamangaon) येथे ट्रक (हायवा) आणि कारची समोरासमोर धडक होऊन अपघात (Accident) घडला. या अपघातात काहीजण जखमी (Injured) झाले आहेत…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी १० वाजेच्या सुमारास साई-सर्विस स्टेशनच्या समोर ईको गाडी क्रमांक एम.एच. १५ एच. एम.२६५७ व समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) ट्रक (हायवा) क्रमांक एम.एच. ४१ ए. यु. ९००१ यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
या अपघातात गाडी चालक मधुकर बांडे हे गंभीर जखमी झाले असून ईको गाडीमधील गणेश पाटील, शांती पाटील, अनिकेत पाटील सर्व राहणार भिवंडी व मिराबाई बनकर, नारायण बांडे, लक्ष्मीबाई बनकर सर्व राहणार भरवीर खुर्द हे किरकोळ जखमी झाले आहेत.
धुलिवंदनच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे भाव
दरम्यान, अपघातानंतर सर्व जखमींना स्थानिकांनी एका रुग्णवाहिकेच्या मदतीने खाजगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.