Sunday, June 14, 2026
HomeनगरAccident News : मालवाहतूक ट्रक शिर्डीच्या स्कूल बसवर पलटी

Accident News : मालवाहतूक ट्रक शिर्डीच्या स्कूल बसवर पलटी

चालकासह पाच जण उड्या टाकल्याने बालंबाल बचावले

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरात एक मालवाहतूक ट्रक नगर-मनमाड महामार्गावरून जात असताना एका स्कूल बसवर पलटी झाल्याची घटना काल रात्री 8 वाजण्याच्या सुमरास घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. तसेच स्कूल बस मध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मालवाहतूक ट्रक क्र. आरजे 19 जीई 8922 हा नगर-मनमाड महामार्गावरून कापसाच्या गाठी घेऊन शिर्डीकडे जात असताना राहुरी शहरातील संत गाडगे बाबा आश्रम शाळेजवळ असलेल्या गतिरोधकावर जोरदार आदळून तो पलटी झाला.

- Advertisement -

याच वेळी शिर्डीतील साई निर्माण स्कूल व ज्युनिअर कॉलेजची बस क्र. एमएच 17 सीव्ही 5191 ही त्या ट्रकला ओव्हरटेक करीत होती. मात्र ट्रक पलटी होऊन त्या स्कूल बसवर पडला. या स्कूल बस मध्ये चार ते पाच जण आणि चालक आकाश कोते होते. त्यांनी प्रसंगावधान राखत ट्रक पलटी होत असल्याचे पाहून बसच्या दुसर्‍या बाजूला उडी घेतल्याने ते बालंबाल बचावले. मात्र स्कूल बसचे मोठे नुकसान झाले.

या घटनेनतंर पोलीस प्रशासनाने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला काढण्यासाठी दोन क्रेनला पाचारण करण्यात आले. जवळपास दोन तास दोन्ही क्रेनच्या साहाय्याने ही वाहने बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, वाहने जागेवरून हलत नव्हते. यामुळे नगर-मनमाड महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनास रात्री 10 वाजण्याच्या ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिस आणि सुज्ञ नागरिक करीत होते.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दीड कोटींचा हस्तगत मुद्देमाल फिर्यादींना परत; परिमंडळ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अंबड विभाग अंतर्गत (Ambad Division of Zone) येणाऱ्या अंबड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, सातपुर पोलीस ठाणे, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे...