Tuesday, March 25, 2025
Homeनगरभरधाव ट्रकची दुचाकीला धडक; पत्नीचा जागीच मृत्यू, पती जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; पत्नीचा जागीच मृत्यू, पती जखमी

सोनेवाडी । वार्ताहर

नगर मनमाड महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

नगर मनमाड महामार्गावरील येसगाव येथील एका पंपाजवळ हा अपघात झाला. नंदूबाई जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव असून तुळशीदास जाधव असे पतीचे नाव आहे.

घडलेली घटना अशी की, नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथील हे दांपत्य जेऊर कुंभारी व सोनेवाडी येथे आपल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी निघाले होते. कोपरगावच्या दिशेने येत असतांना येसगाव शिवारातील जिओ पेट्रोल पंपा समोर त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने चोराची धडक दिल्याने नंदूबाई जाधव (वय ४८) या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार तुळशीदास भीमराव जाधव हे जखमी झाले आहे.

याबाबत अज्ञात ड्रायव्हर विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : लोणकर मळा येथे CCTV फुटेजमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जयभवानी रोड, लोणकर मळा, नाशिकरोड येथे मध्यरात्री १ वाजता बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले व त्याआधी २० मार्च रोजी...