Monday, June 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमालट्रक -बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी

मालट्रक -बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल फाऊंटनजवळ राज्य परिवहन मंडळाची बस व मालट्रक यात जोरदार धडक होऊन  झालेल्या दुर्घटनेत बस चालकासह अनेक प्रवासी जखमी झाले. या अपघातात नेमके किती प्रवासी जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप उपलब्घ होऊ शकली नाही.

पिंपळगाव डेपोची एस.टी. बस क्र. एम.एच.-14-बी.टी.-3327 ही नाशिकहून अंमळनेरकडे जात असतांना समोरून भरधाव वेगाने आलेल्या आर.जे.-11-जी.सी.-3608 या मालट्रकने तिला धडक दिली. फाऊंटन हॉटेलसमोरील महामार्गावर हा मालट्रक दुभाजक ओलांडत असतांना बसवर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की बसचे पुढचे चाक व चालक कॅबीनचा चुराडा झाला.

घटनास्थळी स्थानिक नागरीकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना रूग्णवाहिकेतून मालेगाव येथील रूग्णालयात हलविण्यात आले. बस चालकाची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime Diary : टोळ्यांचा वर्चस्ववाद, पोलिसांसमोर गंभीर आव्हान

0
अहिल्यानगर |सचिन दसपुते| Ahilyanagar  शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाढत्या वर्चस्ववादामुळे पोलिसांसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. सावेडी, एमआयडीसी, केडगाव, भिंगार उपनगरात टोळ्यांमध्ये सातत्याने वाद, खून, खुनाचा...