Tuesday, December 10, 2024
Homeधुळेमोटरसायकलला ट्रकची धडक, पत्नी ठार पती व मुलगा जखमी

मोटरसायकलला ट्रकची धडक, पत्नी ठार पती व मुलगा जखमी

सोनगीर Songir वार्ताहर –

मुंबई-आग्रा महामार्गावर येथील वाघाडी फाट्यावर मोटारसायकलला ट्रकने धडक दिली. त्यात  एक पत्नी ठार आणि तिचा पती व मुलगा जखमी झाले आहेत. हा अपघात आज  दि. 21 रोजी  सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला. 

- Advertisement -

शोभाबाई बारकु भील (वय 25, रा.मोहाडी प्र डांगरी ह. मु. मुडी प्र डांगरी ता. अमळनेर जि. जळगाव) असे मयताचे नाव आहे. बारकू झुलाल भील (वय 26) हा त्याची पत्नी  शोभाबाई व मुलगा संग्राम (वय 4 वर्षे) असे तीघे बुरझड (ता. धुळे) येथे मोटार सायकलने (क्रमांक एमएच 39 एए 5135) त्याचा साडु राजु भील यास भेटण्यास गेले होते. ती मोटार सायकल मुडी गावातील हिरालाल पाटील यांच्या मालकीची असुन ती तात्पुरती वापरण्यासाठी घेतली होती.

शुक्रवारी सकाळी बारकू भील, शोभाबाई व संग्राम हे बुरझड येथून मोटार सायकलने परत मुडीला जातांना वाघाडी फाट्यावर महामार्ग धुळ्याकडून वेगाने येणाऱ्या ट्रकने ( आरजे 11 जीबी 3801) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात बारकू भील व मुलगा संग्राम हे पुढील बाजुस पडले. व शोभाबाई भिल ही मागील बाजुस पडल्याने तिच्या कमरेखालील भागावरून मालट्रक गेल्याने त्यात ती गंभीर जखमी झाली. बारकूला डाव्या खांद्याला व संग्रामला पायाला मार लागला.

धडक देऊन ट्रक चालक पुढे थांबला. जमलेल्या गर्दीतून काहींनी सोनगीर टोलनाक्यावरून रुग्णवाहिका मागवली. तिघांना सोनगीर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारींनी  शोभाबाईला तपासून मयत घोषीत केले.  चालक पवनकुमार ग्यानसिंग (वय 31, रा. खौरपूरा ता. बसेरी जि धौलपुर, राजस्थान) यास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बारकू व संग्राम यांचेवर उपचार करून जाऊ देण्यात आले. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या