Sunday, April 27, 2025
Homeधुळेट्रकची दुचाकीला धडक, एक ठार, दुसरा जखमी

ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार, दुसरा जखमी

धुळे । dhule । प्रतिनिधी

भरधाव ट्रकने (Truck collides) दुचाकीला (two-wheeler) दिलेल्या धडकेत एक ठार (one killed,) तर दुसरा जखमी (injured) झाला आहे. हा अपघात काल दुपारी सुरत-नागपूर महामार्गावरील धुळे तालुक्यातील मोराणे प्र.नेर शिवारात झाला. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisement -

शालीग्राम रतन पाटील (वय 60 रा. मोराणे प्र. नेर) असे मयताचे नाव आहे. ते दि.23 मार्च रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास भाऊ भटु रतन पाटील याच्या सोबत दुचाकीने (क्र.एमएच 18 बीटी 7880) धुळयाकडून साक्रीकडे जात होते. मोराणे प्र. नेर गाव शिवारातील राधा स्वामी सत्संग केंद्रासमोर त्यांना भरधाव वेगाने ओव्हरटेक करीत येणार्‍या ट्रकने (क्र.टीएन 47 व्ही 4585) क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात शालिग्राम पाटील यांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. तर भटू पाटील हे जखमी झाले. अर्जुन रतन पाटील (वय 59 रा. सिताराम नगर, देवपूर) यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “एकही पाकिस्तानी नागरिक…”; CM फडणवीसांचे मोठे विधान, नेमकं...

0
पुणे | Pune  देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) पाकिस्तानी लोकांना (Pakistani People) देश सोडण्याची नोटीस दिली आहे. त्यांना...