Friday, March 28, 2025
Homeनगरट्रक-कंटेनर-स्विफ्टचा भीषण अपघात; दोन ठार एक जखमी

ट्रक-कंटेनर-स्विफ्टचा भीषण अपघात; दोन ठार एक जखमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव (Arangav) परिसरात शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्रक-कंटेनरचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात दोघेजण जागीच ठार (Death) झाले असून एकजण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. मयतांमध्ये सुब्रमण्यम गोबल (वय 48, रा. तामिळनाडू), प्रधान सुरजकरण जाट (वय 36, रा. अजमेर, राजस्थान) या दोन वाहन चालकांचा समावेश आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास बाह्यवळण रस्त्यावर (Bypass Road) अरणगाव परिसरात ट्रक-कंटेनरचा भीषण अपघात (Accident) झाला.

- Advertisement -

तसेच स्विफ्ट कार अपघातग्रस्त वाहनांना पाठीमागून धडकली. यात स्वीफ्टचे मोठे नुकसान झाले. अपघातात जखमी झालेल्या एकास उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अरणगाव ग्रामस्थांसह नगर तालुका पोलिसांनी (Nagar Taluka Police) घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभाग व एनएचआयकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन रस्ता मोकळा करण्यात आला. याच ठिकाणी गेल्या आठ दिवसांपूर्वी दोन वाहनांचा अपघात (Accident) झाला होता. त्यात दोनजण जखमी झाले होते.

त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन केले होते. साईड पट्या, सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक लावण्याच्या आश्वासनानंतर कार्ले यांनी आंदोलन (Movement) मागे घेतले होते. आश्वासन देऊनही कंपनी व अधिकार्यांनी अंमलबजावणी केली नसल्याने दोघांचा बळी गेला आहे. दोघांच्या मृत्यूस जबाबदार असणार्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...