Saturday, September 12, 2026
Homeक्राईमJamkhed : ट्रकचालकास मारहाण करत लुटमार करणारे तिघे जेरबंद

Jamkhed : ट्रकचालकास मारहाण करत लुटमार करणारे तिघे जेरबंद

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

पुणेकडून माजलगावकडे चाललेल्या ट्रकला 31 मार्च रोजी जामखेड साकत रोडवर सावरगावजवळ तीन जणांनी मोटारसायकल आडवी लावून ट्रकच्या काच फोडत चालकाला मारहाण केली आणि चाकूने धमकी देऊन रोख रक्कम व साहित्याची लूट केली. वाहन चालक संतोष बिभीषण फरताडे (रा. सोमनाथ वाडी, ता. जि. बीड) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

- Advertisement -

पोलीसांनी याप्रकरणी शुभम सुर्यभान चव्हाण, शुभम ज्ञानोबा चव्हाण, राम अशोक अडाले (तिघे रा. सावरगाव, ता.जामखेड) व एक अल्पवयीन आरोपी यांना 12 तासांत ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, साहायक पोलीस निरीक्षक किशोर गावडे, पुष्कर कडू, रविंद्र वाघ, देविदास पळसे, कुलदिप घोळवे, आकाश शेवाळे, ज्ञानेश्वर बेल्हेकर, भागीरथ देशमाने, दत्तु बेलेकर, ईश्वर माने, होमगार्ड भारत चव्हाण, संदिप चव्हाण, गणेश गायकवाड, दिंगबर औचारे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे नितीन शिंदे व राहुल गुंडू यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

संपादकीय : १२ सप्टेंबर २०२६ – शेतकरीवर्गासाठी कडवट निर्णय

0
भारत हा कृषिप्रधान देश असल्याचा अभिमान आपण बाळगतो; परंतु देशाच्या अर्थकारणात आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये अन्नदाता असलेला शेतकरी नेहमीच दुर्लक्षित राहतो. शेतकर्‍याने उत्पादित केलेला कांदा...