Saturday, May 4, 2024
Homeजळगावहावडा एक्सप्रेसवर ट्रक धडकला ; प्रवासी जखमी

हावडा एक्सप्रेसवर ट्रक धडकला ; प्रवासी जखमी

जळगाव – Jalgaon

अमळनेर-धरणगाव रेल्वे स्थानका दरम्यान भोणे गावाजवळ आज सकाळी हावडा एक्सप्रेवर ट्रक धडकल्याने या अपघातात प्रवासी जखमी झाले आहेत.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेच्या अमळनेर-धरणगाव स्थानका दरम्यान रेल्वे रूळांचे काम सुरू असून भोणे गावाजवळ अमळनेर कडून हावडा एक्सप्रेस आली असता रेल्वे रूळाच्या कामाचे साहीत्य भरून आलेला ट्रक या एक्सप्रेसवर धडकला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने कार्यवाही करून क्रेनच्या मदतीने ट्रकला बाजूला केले व यानंतर हावडा एक्सप्रेसला जळगावकडे रवाना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या