नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad
नाशिकरोड परिसरातील गजबजलेले ठिकाण समजल्या जाणाऱ्या मुक्तिधाम मंदिर परिसरात रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे रोजच सायंकाळी सहा वाजेच्या नंतर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते त्यामुळे सातत्याने किरकोळ अपघाताचे प्रमाण रोज घडत असतानाच आज सायंकाळी मात्र वाहतुकीच्या कोंडीमुळे व अतिक्रमणामुळे सायंकाळी अपघात होऊन या अपघातात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले.
दोन महिला रस्ता ओलांडत असताना एका ट्रकने धडक दिल्याने सदर अपघातात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या मात्र त्यापैकी एक महिला जागी ठार झाली. सदरचा सदरचा अपघात हा मुक्तिधाम रस्त्यावरील व सोमानी उद्यान परिसरातील वाढत्या अतिक्रमांमुळे झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार बिटको हुन मालधक्का रोडकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच ०४ इ एल ०४४६ या ट्रकने रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या चार चाकी होंडा सिटी कारला जोरदार धडक दिल्याने बाजूला असलेल्या दोन रिक्षाचे पण मोठे नुकसान झाले,तसेच रस्ता ओलांडताना दोन महिलांना देखील ट्रक चालकाची जोरदार धडक दिल्याने त्यांना मोठी दुखापत झाली होती तात्काळ स्थानिक नागरिकांनी या जखमींना तत्काळ नवीन बिटको रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले मात्र औषधोपचार दरम्यान 45 वर्षीय सुनीता वाघमारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर शीतल केदारे या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
इतर जखमी झालेल्या रुग्णावर उपचार सुरु असून या विचित्र अपघाताने संपूर्ण नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे,पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . दरम्यान याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.




