दोंडाईचा Dondaicha । श.प्र.
गुजरात राज्यातील (state of Gujarat) सोनगड (Songad) येथून ट्रक चोरी (Truck theft) करून नंदुरबार मार्गे धुळ्याच्या दिशेने जाणार्या दोघांना (both) येथील पोलिसांनी पकडले (Caught by the police). दोघांना अटक (arrested) करण्यात आली असून त्यांच्याकडून ट्रक जप्त (Truck seized) करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपी हे धुळ्यातील रहिवासी आहे.
सोनगड येथुन दि.28 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास रविंद्र एल. सुर्यवंशी (रा. अलीमनगर, टेकडा, सोनगड, जि. तापी, गुजरात) यांच्या घरासमोरून दोन चोरट्यांनी जीजे 26 टी 5450 क्रमांकाचा ट्रक लंपास केला असून तो नवापुरमार्गे नंदुरबार कडुन घेवून जात असल्याची माहिती सुरत येथील क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक वाय. एस. शिरसाठ यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना दिली. त्यानुसार त्यांनी सकाळी 8 वाजेपासुन नंदुरबार चौफुली येथे नाकाबंदी लावली.
नाकाबंदीवरील पोहेकॉ उमेश चव्हाण, चालक राजेंद्र सोनवणे, पोना प्रेमराज पाटील हे नंदुरबारकडुन येणार्या प्रत्येक ट्रकची तपासणी करीत होते. तेव्हा त्यांना सचिन हॉटेलच्या जवळ सौरभ मंगल कार्यालय येथे संशयीत ट्रक उभा केलेला दिसला. त्यामुळे त्यांनी चालकास विचारपुस केली असता त्यांनी आमचा ट्रक खराब झालेला असून त्यांची दुरुस्ती करीत आहोत, अशी उत्तरे दिली.
तसेच दोघांनी त्यांची नावे समीर रफिकशाह (रा.100 फुटी रोड, पत्रावाली मस्जिद समोर, धुळे) व मलीक अब्दुल शहा (रा. चाळीसगाव रोड, 100 फुटी रोड, वडजाई रोड, धुळे) असे सांगितले. त्यानंतर त्याचे छायाचित्र पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना पाठविला असता त्यांनी दोघा चोरट्यांना ओळखले. म्हणुन दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी ट्रक चोरी केल्याची कबुली दिली. ट्रक व आरोपींना सुरत क्राईम ब्रांच पोलिसांकडे सोपविण्यात आले.