Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेश...तर चीनसोबतचे सर्व संबंध तोडणार

…तर चीनसोबतचे सर्व संबंध तोडणार

नवी दिल्ली –

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनमधून करोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याचे

- Advertisement -

म्हटले आहे. चीनमधून करोना आलाय ही गोष्ट आपण कधीच विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जर देशातील नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी मतदान केलं तर अमिरेका चीनसोबतचे सर्व संबंध तोडून टाकेल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. करोनानंतर आपल्यासाठी बीजिंगचं महत्त्व पूर्वीप्रमाणे राहिलं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी सांगितलं, अमेरिकेची अर्थव्यवस्था अत्यंत चांगल्या स्थितीत असताना चीनमधून करोना संसर्गाचा हल्ला झाला. त्यांनी असं होऊ द्यायला नको होतं, आम्ही हे कधीच विसरणार नाही. आम्ही संपूर्ण देशावर बंधनं आणली होती. आम्ही लाखो लोकांचे जीव वाचवले. आता आम्ही निर्बंध शिथील केले असून नवा रेकॉर्ड केला आहे, जर मला अजून चार वर्ष मिळाली तर अमेरिकेला देशातील उत्पादन महासत्ता बनवणार. चीनवर अवलंबून राहणं पूर्णपणे संपवून टाकणार.

दरम्यान , करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत दोन लाखांहून अधिक नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही करोनाचा मोठा फटका बसला असून लाखो लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि चीनसोबत व्यापारी करारांवर स्वाक्षरी झाल्यानंतर काही काळातच करोना संकट निर्माण झालं होतं. या करारासाठी अमेरिका आणि चीनमध्ये जवळपास एक वर्ष चर्चा सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या