Monday, May 27, 2024
Homeनगर...अन् दानपेटी फोडण्याचा प्रयत्न फसला!

…अन् दानपेटी फोडण्याचा प्रयत्न फसला!

खैरी निमगांव | वार्ताहर

खैरी निमगावसह (Kairi Nimgoan) पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघाई देवीची (Waghai Devi) दक्षीणापेटी फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला असुन हा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र या घटनेची तालुका पोलीसांत फिर्याद देण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ११ ऑगस्ट रोजी सकाळी देवीचे विश्वस्त ज्ञानेश्वर भगुरे हे मंदीरात आले असता दान पेटीचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब शेजूळ यांना संपर्क केला. अध्यक्ष शेजुळ यांनी देवीभक्त अरुण गमे, शिवाजी साबळे यांच्यासह विश्वस्त भाऊसाहेब तांबे, खजिनदार शिवाजी एलम, तसेच ज्ञानेश्वर भगुरे यांच्यासमक्ष दक्षीणापेटीची पाहणी केली असता कुलुप तोडल्याचे दिसून आले. मात्र दक्षिण पेटीच्या आत असलेले एक कुलुप लोखंडी सळईने न तुटल्याने चोरट्यांना दक्षिणा पेटीतील रक्कम काढता आली नाही. त्यानंतर जमलेल्या वरील सर्वांसमक्ष दानपेटी उघडण्यात येऊन त्यातील रकमेची मोजणी करण्यात आली ५१,७८५ रुपये ट्रस्टकडे जमा करण्यात आले.

वाघाई देवी मंदीर परीसरात कॅमेरे बसवलेले असुन चोरीपुर्वी चोरट्यांनी विद्युत डिपीशी छेडछाड करून त्या भागातील विज बंद केली होती. तसेच येथील देवीसमोरील कॅमेऱ्याची दिशा बदलवली होती. या घटनेनंतर सतर्क होऊन ट्रस्टच्या वतीने देवीसमोर स्वतंत्र विद्युत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात मंदीरे बंद असल्याने गावातील फुल व्यवसाय करणारे अरुण गमे यांच्याकडून शासकीय नियमांचे पालन करत दररोज सकाळी अनेक भाविकांच्या नावे देवीला हार घालण्याची आणी हाराची मिळणारी रक्कम दानपेटीत टाकण्याची व्यवस्था गमे यांनी केली असल्याने दररोज पेटीत पैसे येत आहेत. तसेच गावातील लहान थोर प्रत्येक व्यक्ती वाढदिवसाच्या दिवशी देवीला हार घालण्याकरीता पैसे देतात हार गमे यांच्याकडून विनामुल्य दिला जातो. हाराची मिळणारी रक्कम दानपेटीत टाकली जाते. यामुळे तिन महीन्यात ५१,७८५ रुपये जमा झाले असुन या घटनेमुळे फोन पे गुगल पे सुवीधा ट्रस्टच्या वतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या