Wednesday, May 29, 2024
Homeनगरसंगमनेरात पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

संगमनेरात पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

नाकाबंदी करणार्‍या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास नाशिक- पुणे महामार्गावरील शासकीय विश्रामगृहासमोर घडली. सतीश दत्तात्रय इटप (रा. मालदाड रोड, संगमनेर) हा सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह कार मधून (क्रमांक एम.एच.19 सी. आर. 3385) संगमनेरच्या दिशेने येत होता.

- Advertisement -

शासकीय विश्रामगृह समोर शहर पोलीस वाहन तपासासाठी उभे होते. इटप हा वेगाने गाडी चालवत असल्याने नाकाबंदी पॉईंट वरील पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्यास सांगितले. त्याने गाडी न थांबवता गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तो पळून जात असताना समोरील ब्रिझा गाडी (क्र. एम एच 22. बी. एच. 2512) हिला धडक दिली. पोलिसांनी अडवले असता त्याने उपस्थित पोलिसांसोबत वाद घातला. पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना शिवीगाळ करून धमकी दिली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सतिष इटप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या