Saturday, April 26, 2025
Homeमनोरंजनतुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण : शीजान खानचा पोलिस कोठडीतील मुक्काम 'या'...

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण : शीजान खानचा पोलिस कोठडीतील मुक्काम ‘या’ तारखेपर्यंत वाढला

मुंबई | Mumbai

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Actress Tunisha Sharma) आत्महत्येनंतर तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शीजान खानला (Sheezan Khan) अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (Court) त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर आता पुन्हा एकदा शीजान खानच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे.

- Advertisement -

अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवार (दि.२४) रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर रविवार (दि.२५) रोजी शीजान खानला अटक करण्यात आली होती. शीजान खान आणि तुनिषा शर्मा हे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, ब्रेकअपमुळे तुनिषाने तणावातून आत्महत्येसारखे (Suicide) टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

तसेच शीजान खान एकाचवेळी अनेक मुलींना डेट करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १७ जणांचे जबाब नोंदविले असून शीजान पोलिसांना (Police) सहकार्य करत नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, २५ डिसेंबर रोजी शीजानला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यावेळी त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा न्यायालयाने शीजानला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...