पुणे | प्रतिनिधी Pune
- Advertisement -
पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका कारनं एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या बारा विद्यार्थ्यांना कारनं उडविले. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुण्यातील मध्यवर्ती भागात भावे हायस्कूलजवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी त्या परिसरात राहतात. संध्याकाळी सगळे विद्यार्थी तिथं चहा घेत होते. चालकाचं नियंत्रण कारवरील सुटल्यानंतर त्यानं विद्यार्थ्यांना धडक दिली. विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार सुरु आहेत
दरम्यान पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी असून नऊ जण किरकोळ जखमी झाल्याची पोलिसांची माहिती आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांची उद्या परीक्षा असून ते उद्या या परीक्षेला सामोरे जाणार होते.