Sunday, June 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजघराची भिंत कोसळून बारा वर्षीय मुलीचा मृत्यू

घराची भिंत कोसळून बारा वर्षीय मुलीचा मृत्यू

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

- Advertisement -

उंबरपाडा दिगर येथे रहात्या घराची भिंत अंगावर कोसळून हेमलता माणिक गायकवाड (वय १२) हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेमलता जिल्हा परिषद शाळा उंबरपाडा दिगर येथे इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थीनी होती.

हेमलता ही शाळा सुटल्यावर सहा वाजेच्या दरम्यान घरी गेली असता रहात्या घराच्या भिंती लगत पिंपमध्ये साठवून ठेवलेले पाणी काढायला गेली. त्याच क्षणी घराच्या चांदव्याची कच्ची मातीची भिंत अंगावर कोसळल्याने ती मातीच्या ढिगार्‍याखाली दबली गेली. तिने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी धाव घेत तात्काळ मातीच्या ढिगार्‍यातून बाहेर काढले. तिला उपचारासाठी तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले.

याबाबत पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता तालुक्यातील 22 गावांची पोलीस पाटील भरती रखडली

0
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpri Nirmal राहाता तालुक्यातील 22 गावांच्या रिक्त झालेल्या पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया रखडली आहे. भरतीसाठी आरक्षण सोडतीही पार पडल्या आहेत. मात्र राजकीय...