Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकच्या तेवीस अधिकारी, अंमलदारांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

नाशिकच्या तेवीस अधिकारी, अंमलदारांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर



नाशिक | प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत मानाचे समजले जाणारे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-२०२५’ नुकतेच जाहीर झाले असून, यामध्ये नाशिकमधील २३ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी बाजी मारली आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी या सन्मानचिन्हांची घोषणा केली.

यात नाशिक शहर पोलीस दलातील दहा आणि सीआयडी विभागातील एका अधिकार्‍याचा समावेश आहे. या पुरस्कारामुळे नाशिक पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, यामुळे पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -



पद सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी, अंमलदार

  • पोलीस निरीक्षक अशोक उमाजी शरमाळे, सोहन कनियन माछरे, तृप्ती दत्तात्रय सोनवणे, सचिन मुरलीधर खैरनार, संतोष बबनराव नरुटे
  • सहायक पोलीस निरीक्षक हेमंत सुभाष तोडकर
  • पोलीस उपनिरीक्षक संदीप रामराव पवार
  • सहायक उपनिरीक्षक संजय विठोबा सानप, दिलीप धोंडू भारते, दिनकर बाबूराव खैरनार, सुनील खंडेराव कोकाटे
  • पोलीस निरीक्षक (सीआयडी) राजेंद्र धर्मा उशिरे (गुन्हे अन्वेषण विभाग


ग्रामीण पोलीस दलातील यांचा गौरव
ग्रामीण पोलीस दलातून सोमनाथ बाजीराव ह्याळीज (नियंत्रण कक्ष, मालेगाव), शरद पांडुरंग गांगुर्डे (जातपडताळणी विभाग), सचिन दिलीप धारणकर (स्थानिक गुन्हे शाखा), शांताराम पंढरीनाथ घुगे (विमानसेवा, ओझर), कैलास रामभाऊ खैरे (चांदवड पोलीस ठाणे), सतीश रामनाथ जगताप (स्थानिक गुन्हे शाखा), दिनेश माधवराव पवार (नियंत्रण कक्ष, मालेगाव), करुणा अनिल आहेर (एएचटीयू), नीलिमा माधवराव मोरे (अर्ज शाखा), प्रदीप श्रावण बहिरम (सायबर पोलीस ठाणे), रमेश वामनराव काकडे (मोटर परिवहन विभाग) आणि जितेंद्र शिवराम रायते (नागरी हक्क संरक्षण विभाग) या अंमलदारांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

NDCC News : निफाड कारखान्याच्या वसुलीवरून गदारोळ; जिल्हा बँक सर्वसाधारण सभेत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Bank) ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयात निफाड सहकारी साखर कारखान्याची थकबाकी...