Thursday, July 23, 2026
Homeमहाराष्ट्र'ताज का राज' फुटला तर…; अशोक खरात प्रकरणावरुन शिवसेना महिला नेत्यांमध्ये जुंपली;...

‘ताज का राज’ फुटला तर…; अशोक खरात प्रकरणावरुन शिवसेना महिला नेत्यांमध्ये जुंपली; म्हात्रे-अंधारेंमध्ये पेटला ट्विटर वॉर

मुंबई | Mumbai
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण सध्या देशासह राज्यभरत चांगलचे गाजत आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचेच धाबे दणाणले आहेत. अशोक खरात हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात होता, तो बड्या नेत्यांचा अध्यात्मिक गुरु होता. त्याच्या बाबत अनेक नवे खुलासे समोर येत असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी खरात प्रकरणावरुन उध्दव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. “मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर क्रूरकर्मा खरातला पाण्याची जोडणी दिली होती” असं म्हटलं आहे.

ताज का राज फुटला तर तोंडचं पाणी पळेल
शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खळबळ उडवून देणारी आणि ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाला लक्ष करणारी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हात्रेंनी लिहिले आहे की, क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असे ट्विट शीतल म्हात्रेंनी केले आहे. तसेच खरात_फाईल्स असा हॅशटॅगही वापरला आहे.

- Advertisement -

शीतल म्हात्रेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तरउत्तर
शीतल म्हात्रे यांच्या या आरोपाला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत. राज्यसभेच्या निमित्ताने एका चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोरे किंवा शितल मात्रे या बायकांचा Self Goal केला ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही असे या तथाकथित स्वयंघोषित शिंदेंच्या निकटवर्तीयांना वाटते.”

तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल
विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल यासाठी दोघीही जोमाने कामाला लागल्या मग सभागृहामध्ये नीलम गोऱ्हे अकलेचे तारे तोडायला लागल्या तर सभागृहाच्या बाहेर शितल म्हात्रे…. म्हात्रे काय, गोऱ्हे काय… यांचे कवित्व करायला पाने पुरणार नाहीत… दोघींनाही प्रेमळ सल्ला.. आवरा स्वतःला मला संशोधन करण्याची वेळ आणू नका…!” असा इशाराच सुषमा अंधारेंकडून शिंदे गटातील महिला नेत्यांना देण्यात आला आहे.

आदू बाळाने राऊतची कॉलर धरली म्हणे
त्यानंतर शितल म्हात्रेंनी म्हटले की, “ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल??? प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला. आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा??? त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे. ताई, खासदार-आमदार व्हायची स्वप्नं आता सोडून द्या…मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही”.

Bhide Guruji On Kharat: ‘सापाला सोडता कामा नये…’; अशोक खरात प्रकरणावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया, म्हणाले, मारून टाकून…

त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो?”
त्यावर सुषमा अंधारेंनी उत्तर दिलं की, “अहो विषय भरकटवू नका… आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत… बाय द वे तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असं तुम्ही म्हणाला होतात.. तोच तो सुर्वे प्रकरणातला… त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो?”.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...