Friday, June 21, 2024
Homeनगरदोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शहराजवळ सोमवारी (दि. 6) दोन रस्ते अपघात झाले असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात नगर कल्याण रस्त्यावर टाकळी खातगाव (ता. नगर) गावच्या शिवारात तर दुसरा अपघात नगर मनमाड रस्त्यावर बोल्हेगाव फाटा परिसरात घडला आहे.

कल्याण रस्त्यावरील अपघातात निलेश दत्तात्रय ढोणे (वय 21 रा. भाळवणी ता. पारनेर) हा युवक मयत झाला आहे. तो सोमवारी पहाटे चारच्या सुमारास भाळवणीवरून कल्याण रस्त्याने दुचाकीवर नगरकडे येत असताना टाकळी खातगाव गावच्या शिवारात हॉटेल साईराज समोर एका भरधाव वेगात चाललेल्या मालट्रकने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरा अपघात नगर मनमाड रस्त्यावर बोल्हेगाव फाटा परिसरात हॉटेल चैतन्य समोर सकाळी 7.30 च्या सुमारास घडला. यात एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणारे किरण गंगाधर कडेकर (वय 41 रा. बालिकाश्रम रस्ता, नगर, मूळ रा. कोरडगाव, ता. पाथर्डी) यांचा मृत्यू झाला आहे. ते कंपनीत कामाला दुचाकीवर जात असताना बोल्हेगाव फाटा येथे एका मालवाहू टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री 10 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या