Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, बुलढाण्यातून दोघांना अटक

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, बुलढाण्यातून दोघांना अटक

दिल्ली । Delhi

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तींकडून ईमेल आला. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली. मंत्रालय आणि जे जे मार्ग पोलीस ठाण्यात धमकीचा ईमेल आला.

- Advertisement -

याप्रकरणी आता दोन संशयित आरोपींना मुंबई क्राइम ब्रँचने अटक केली आहे. या दोन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून ताब्यात घेतलं असून ते मुंबईकडे निघाले आहे. मंगेश वायाळ व अभय शिंगणे असं या आरोपीचे नाव आहे.

मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव येथे मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही नात्याने मामा आणि भाचे आहेत. मंगेश हा नात्याने अभयचा मामा आहे.

एकनाथ शिंदे यांना यापूर्वीही धमकी देण्यात आली होती. गत महिन्यातच इंस्टाग्राम लाईव्ह करत एका 26 वर्षीय युवकाने शिंदे यांना शिविगाळ केली होती, तसेच धमकीही दिली होती. त्यानंतर ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून हितेश प्रकाश ढेंडे याला अटक केले होते. तपासात हा इसम विकृत असल्याचे समोर आले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...