Saturday, July 27, 2024
Homeनाशिकप्रतिबंधीत ई-सिगारेट विक्रीप्रकरणी दोघांना अटक

प्रतिबंधीत ई-सिगारेट विक्रीप्रकरणी दोघांना अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Police Commissioner Ankush Shinde) यांना नाशिक शहरात शाळा व कॉलेज मधील तरुण मुले व्यसनाच्या (addiction) अधीन जाऊन नशा करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी बेकायदेशीर रित्या प्रतिबंधीत नशेच्या वस्तु व साहित्य साधने विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून (Police) शहरात कारवाई सुरू आहे.

- Advertisement -

गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे पोलीस अंमलदार नाझिमखान पठाण यांना गुन्हे प्रतिबंधक गस्त दरम्यान एक संशयित प्रतिबंधीत इलेक्ट्रॉनिक सिगारेट (Electronic cigarettes) (निकोटीन युक्त हुक्का) विक्री करीता हॉलमार्क चौक, कॉलेजरोड येथील विजुज दाबेली शेजारी असलेल्या वॉड्रॉप नावाचे दुकानासमोर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Inspector of Police) विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, नाझिमखान पठाण, आसिफ तांबोळी, महेश साळुंके, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, किरण शिरसाठ यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शहरातील कॉलेजरोड येथील विजुज दाबेली जवळ सापळा रचून पोलिसांनी कारवाई करून वेगवेगळ्या फ्लेवरच्या एकूण ९ निकोटीन युक्त ई-सिगारेटच्या बॉक्स मध्ये वेगवेगळया फ्लेवरचे प्रतिबंधीत असलेले ८० नग निकोटीन युक्त ‘ई’ सिगारेट ८७ हजार ९०० रुपये किंमतीचा माल हस्तगत करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. कारवाईत सर्वेश रामधनी पाल (वय २८) व फैसल अब्दुलबारे शेख (वय २८) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या