नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील महिलेचा खून (Murder of a woman) करणार्या दोघांना (both) स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (Local Crime Investigation Branch) पथकाने अटक (arrested) केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.1 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पोलीसांना माहिती मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा शिवारातील नरोत्तम पाटील यांचे बाजरीचे पिक असलेल्या शेतात एक 30 ते 35 वर्षे वयाची अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कोळदा गावातील नागरिकांकडून मिळाली.
घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मृतदेहाची पाहणी केली असता मृत महिलेच्या गळयावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारून बाजरी पिकाचे शेतात फेकुन दिले होते. शवविच्छेदनानंतर भा.द.वि. कलम 302 अन्वये अज्ञात आरोपीताविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गारबर्डी वनजमिनीवरील ८ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला यश
मयताच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन जिवे ठार केले होते.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार केली.समाज माध्यमावर मयताचा व मयताच्या हातवर गोंदलेले फोटो प्रसिध्द् केल्यानंतर दि.1 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास श्री.पाटील यांना एका नागरिकाने कळविले की, सदर महिला कोळदा येथील आहे, परंतु बरीच वर्षे झाली ती कोळदा गावी आलेली नाही. पथकाने तात्काळ कोळदा येथे जावून मयत महिलेच्या वडीलांची भेट घेतली व त्यांच्याकडे विचारपूस केली. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पथकाने मयताच्या वडीलांना मयताच्या हातावर गोंदलेले फोटो दाखविले असता त्यांनी ती त्यांचीच मुलगी असल्याचे सांगितले.
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…
दरम्यान, कोळदा येथील महिलेचा खून त्याच गावातील येथील राहणारा इसम नामे बन्या पाडवी व त्याचा साथीदार पिंटू भिल अशांनी मिळून केल्याची माहिती श्री.पाटील यांना मिळाली. त्यांनी श्री.खेडकर यांना दोन्ही संशयीत इसमांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या.संशयीत बन्या पाडवी व त्याचा साथीदार पिंटू भिल दोघांना ताब्यात घेवुन विचारपुस केली.
दोन्ही आरोपीतांनी गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली. ताब्यात घेण्यात आलेले बन्या सन्या पाडवी (वय-55 वर्षे,रा.कोळदा), परान ऊर्फ प्रविण ऊर्फ पिंट्या धडू भिल (वय40, रा.कोरीट) यांना गुन्ह्याच्या तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. खूनासारखा गंभीर व क्लिष्ट गुन्हा उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणार्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास श्री.पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.
Visual Story : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा गुलाबी लुक पाहाल तर तुम्ही व्हाल आशिक…