Saturday, April 26, 2025
Homeनगरदोन सहायक निरीक्षकांसह तीन कर्मचार्‍यांची निलंबनातून मुक्तता

दोन सहायक निरीक्षकांसह तीन कर्मचार्‍यांची निलंबनातून मुक्तता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलातील निलंबित झालेल्या दोन सहायक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचार्‍यांची तात्पुरत्या स्वरूपात निलंबनातून मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

- Advertisement -

यामध्ये तत्कालिन नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांना 16 फेब्रुवारीला निलंबित केले होते. त्यांना आता राहुरी पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे. तसेच सहायक निरीक्षक दिलीप राठोड यांना 13 एप्रिल रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांना आता कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे. तसेच निलंबित झालेले पोलीस हवालदार संतोष वाघ यांना पोलीस मुख्यालय, पोलीस हवालदार शिवनाथ बडे यांना पारनेर पोलीस ठाण्यात व पोलीस नाईक रामदास सोनवणे यांना पाथर्डी पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे.

निलंबनातुन करण्यात आलेली मुक्तता ही पुर्णत: तात्पुरत्या स्वरूपाची असून भविष्यात त्यांच्या विरूद्ध करण्यात येणार्‍या कारवाईस कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. सदर कर्मचार्‍याच्या निलंबन कालावधीबाबत न्यायालयीन निर्णयाचे खातेनिहाय शिस्तभंग विषयक कारवाईचा अंतिम निर्णय झाल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...