Monday, September 28, 2026
Homeनगरदोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर-सुपा रस्त्यावर एमआयडीसी चौकात दोन दुचाकींची समोरासमोर धडक (Bike Accident) होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू (Death) झाला असून एक जण जखमी (Injured) झाला आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र विठ्ठल बढे (रा. वडनेर हवेली, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, बुधवारी (11 सप्टेंबर) पहाटे 12.45 वाजता माझा मावस भाऊ योगेश शिवाजी भालेकर (रा. वडनेर हवेली) व त्यांचे मित्र देंडगे (पूर्ण नाव नाही, रा. पारनेर) हे सुप्यावरून पारनेरच्या दिशेने जात असताना बुधवारी पहाटे 12.45 वाजता सुपा एमआयडीसी चौकात आले असता तेथे पारनेर रस्त्याकडून (Parner Road) सुप्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीने समोरून जोराची धडक झाली. यात योगेश शिवाजी भालेकर गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला तर त्याचे सहकारी देंडगे जखमी (Injured) झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

अपघाताची माहिती कळताच सुपा पोलीस ठाण्याचे (Supa Police Station) पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला रूग्णालयात दाखल केले व आपघातग्रस्त वाहने बाजुला केली. उपनिरीक्षक एस. पी. कानगुडे पुढील तपास करत आहे.

ताज्या बातम्या

मुंढे इफेक्ट फक्त किचनमध्ये नको, एफडीएच्या कार्यालयातही दिसावा; संजय राऊतांचे तुकाराम...

0
मुंबई । Mumbai आपल्या शिस्तबद्ध आणि कडक कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय वर्तुळात ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे...