राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी (Rahuri) तालुक्यातील बारागाव नांदूर (Baragav Nandur) परिसरात काल दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी दोन दुचाकींचा समोरासमोर भिषण अपघातात (Accident) आदित्य बर्डे हा पंधरा वर्षीय मुलगा ठार (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली तर दोनजण गंभीर जखमी (Injured) झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेखर किशोर माळी (वय 19 रा.राहुरी खुर्द, ता. राहुरी) हा तरुण दि. 8 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजे दरम्यान त्याच्या दुचाकीवरून राहुरीकडून बारागाव नांदूरकडे जात होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीवर आदित्य बर्डे हा मागे बसलेला होता. बारागाव नांदूर गावठाण, हावरी ओढा येथे शेखर माळी यांच्या दुचाकीची (Bike) तसेच समोरून येणारा सोमनाथ नामदेव शिंदे याच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी हजर राहून अपघातात (Accident) जखमी झालेल्या तीनही मुलांना रुग्णालयात हलविले.
यावेळी आदित्य शशिकांत बर्डे (वय 15, रा. बारागाव नांदूर) हा मुलगा रुग्णालयात उपचार सुरू असताना मयत झाला. तसेच शेखर किशोर माळी व सोमनाथ नामदेव शिंदे हे हे दोन तरुण गंभीर जखमी (Injured) झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अंबादास गिते यांनी घटनेचा पंचनामा केला तर वैद्यकीय अधिकारी प्रवीण शिरसागर यांनी मयत आदित्य बर्डे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.




