Saturday, May 18, 2024
Homeजळगावभरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोन मित्र ठार

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोन मित्र ठार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरात दिवसभर पेरुची विक्री (Sale of Peru) करुन दुचाकीवर घराकडे परतणार्‍या दुचाकीस्वारांना (bikers) समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या (breakneck speed) कारने (car)जोरदार धडक (hit hard) दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास रामदेववाडीजवळील हनुमान मंदिराजवळ घडली. या अपघातात (accident) रफिक हुसेन मेवाती (वय-23),अरबाज जहांगीर मेवाती (वय-20) दोन्ही रा.राणीचे बांबरुड ता.पाचोरा या हे दुचाकीस्वार (Both bikers) जागीच ठार (Killed on the spot) झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती.

- Advertisement -

प्रियकराचा पतिवर हल्ला

पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे रफिक हुसेन मेवाती व अरबाज जहाँगीर मेवाती हे दोघ कुटुंबियांसह वास्तव्यास होते. रफिक हा दररोज भावंडांसोबत जळगावात पेरु विक्री करण्यासाठी येत होता. दरम्यान, रफिकने मास्टर कॉलनीत दिवसभर पेरु विक्री करुन तो सायंकाळी साडेसहा वाजता दुचाकी (एमएच 19 सीएच 4359) त्याचा मित्र अरबाज जहांगीर मेवाती (वय-21) याच्यासोबत राणीचे बांबरुड येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिरा जवळून दुचाकीने जात असताना पाचोर्‍याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणार्‍या (एमएच 19 बीजे 2175) क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील दोघ मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

चोपड्याची दिप्क्षीका माळी इंडिगो एअरवेज कंपनीची एअरहोस्टेजVISUAL STORY : ऋतुराजविषयी जरा स्पष्टच बोलली सायली संजीव

मित्रासोबत घरी जातांना काळाची झडप

अरबाज हा हातमजूरी करुन कुटुंबाला हातभार लावित होता. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपुर्वी त्याने आयशर ही मालवाहू गाडी घेतली होती. त्यानिमित्त तो औरंगाबाद येथे गेला होता. काम आटोपल्यानंतर तो जळगावात आला आणि येथून अरबाज व रफिक हे दोघ मित्र घरी जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि दोघ मित्रांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.

मू.जे. महाविद्यालय ‘कंदील’ एकांकिकेचा पनवेलमध्ये डंका

पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी

अपघातात एकाच गावातील दोघ तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची कळताच दोघांच्या नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात गर्दी केली होती. तसेच यावेळी इतर दोन अपघातातील जखमींना आणल्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते.

थरार : चालत्या कारने घेतला पेट

रफिकच्या लग्नाची सुरु होती बोलणी

पेरु विक्रेता रफिक मेवाती आई, वडील, तीन भाऊ आणि बहीसह वास्तव्यास होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची बोलणी सुरु होती. तसेच अरबाज याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने दोघांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला.

Photos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : भीम चळवळीचा नवा अध्याय ‘एक रोझ’

अपघातात कारचा चूराडा

अपघातात कारच्या पुढच्या भागाचा पुर्णपणे चूराडा झाला होता. तर दुचाकी ही रस्त्याच्या कडेला पडलेली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या