Saturday, May 18, 2024
HomeUncategorizedछत्रपती संभाजीनगरात दाेन अब्ज रुपयांचा घोटाळा उघड

छत्रपती संभाजीनगरात दाेन अब्ज रुपयांचा घोटाळा उघड

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

नेहमीच चर्चेत राहणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत कर्ज मंजुरी ही संस्थेच्या मंजूर पोटनियमातील तरतुदीनुसारच झालेली आहे किंवा नाही, याची चाचपणी लेखापरीक्षणाद्रारे केली असता ते पोटनियमातील तरतुदीनुसार झाले नसल्याचे निदर्शनास आले. यात सुमारे २०२ कोटी २४ लाख ६३ हजार ९६० रुपयांचे कर्ज वाटप नियमबाह्य झाले असल्याचा ठपका पतसंस्थेच्या संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात विशेष लेखापरीक्षक सुधाकर गायके यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संचालक मंडळासह विविध शाखांच्या व्यवस्थापकांवरही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०१६ ते २०१९ आणि २०१८ ते २०२२ या कालावधीतील कर्ज प्रकरणांमध्ये २०२ कोटी २४ लाख ६३ हजार ९६० रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी अध्यक्षांसह ५० जणांविरुद्ध सिडको ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. तारण कमी अन्‌ कर्ज जास्त, कागदपत्रे अपूर्ण असे प्रकार लेखापरीक्षण चाचणीत समोर आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रकरणात विशेष लेखापरीक्षक धनंजय चव्हाण आणि सुधाकर गायके हे दोघे फिर्यादी आहेत. चव्हाण यांनी २०१६ ते २०१९ आणि गायके यांनी २०१८ ते २०२२ या कालावधीचे लेखापरीक्षण केले आहे. चव्हाण यांनी १०३ कोटी आणि गायके यांनी ९९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची फिर्याद दिली आहे. सर्व शाखा आणि मुख्य शाखेत कर्ज मागणीचे अर्ज येतात.

मुख्य आरोपी अंबादास आबाजी मानकापे (अध्यक्ष), संचालक मंडळ सदस्य महेंद्र जगदीश देशमुख, अशोक नारायण काकडे, काकासाहेब लिंबाजी काकडे, भाऊसाहेब मल्हारराव मोगल, त्रिंबक शेषराव पठाडे, रामसिंग मानसिंग जाधव, गणेश ताराचंद दौलनपुरे, ललिता रमेश मून, सपना संजय निर्मळ, अनिल अंबादास पाटील, प्रेमिलाबाई माणिकलाल जैस्वाल, पंडित बाजीराव कवटे, संबंधित शाखाप्रमुख (नावे नाहीत), कर्ज विभागप्रमुख (नावे नाहीत) व इतरांचा समावेश आहे.

मुख्य कार्यालयातील कर्ज विभागाकडून त्याची छाननी केली जाते. त्यानंतर पोट नियमातील तरतुदीनुसार पात्र असल्यास संस्थेच्या संचालक मंडळाने सभा घेऊन सर्वसमावेशक विचार करून मंजुरी दिल्यावर कर्ज वितरण करणे बंधनकारक असते. मात्र, चव्हाण यांनी २०१६ ते २०१९ या कालावधीत केलेल्या चाचणी लेखापरीक्षणात पोटनियमातील अनेक तरतुदींचा भंग झाल्याचे आढळले. या कालावधीत आरोपींनी कट रचून २३ कर्जदारांना ९१ कोटी ७९ लाख ४४ हजार ६४ रुपयांचे विनातारण कॅश क्रेडिट कर्ज वाटप केले. त्यांनी अपहार करण्याच्या उद्देशाने हा गैरव्यवहार केला. तसेच सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

कर्जदारांची यादी 
रामहरी तातेराव काकडे (३ कोटी ९५ लाख ४२ हजार ५५१), बबन नारायण भोसले (४ कोटी ९ लाख १० हजार ६८१ रुपये), रामेश्‍वर बाबूराव काकुरे (२ कोटी ६४ लाख ५४ हजार ५९० रुपये), रत्नकला नबाजी कचकुरे (३ कोटी ८४ लाख ५४ हजार २२१), विलास मुरलीधर तांबे (२ कोटी ३९ लाख ५८ हजार ६३५), नबाजी विठ्ठलराव कचकुरे (२ कोटी २५ लाख ६७ हजार ६६४), शहा कादर अमर शहा (४ कोटी ३३ लाख ५७ हजार ४१ रुपये), बद्रीनाथ दादाराव कचकुरे (३ कोटी २२ लाख ९४ हजार ११६), नबाजी विठ्ठलराव कचकुरे (१ कोटी ९२ लाख ५० हजार २४९), नामदेव दादाराव कचकुरे (२ कोटी ३८ लाख ९५ हजार १५१), नारायण दादाराव कचकुरे (३ कोटी २५ लाख ४६ हजार ६२७), हरिभाऊ विठ्ठलराव कचकुरे (३ कोटी २५ लाख ४७ हजार ९३३), दौलत विठ्ठलराव कचकुरे (२ कोटी ५९ लाख ९२ हजार ६३२), गणेश अरुण मोकाशे (४ कोटी १२ लाख ५ हजार ९९५), आदर्श अप्रतिम गावकरी (१० कोटी ७५ लाख २३ हजार १९३), आदर्श जनकल्याण प्रतिष्ठान प्रा. लि. सहकर्जदार साई सन्स अण्ड कंपनी (२० लाख १७ हजार ३६ रुपये आणि ४ कोटी ८२ लाख ६० हजार १५६ रुपये), आदर्श जनकल्यण प्रतिष्ठान (९ लाख ५४ हजार ३३९ ), जयकिसान जीनिंग-प्रेसिंग सहकारी संस्था म., करमाड (१६ कोटी ५४ लाख ८१ हजार १२७), आदर्श बिल्डर अण्ड डेव्हलपर्स (७ कोटी १७ लाख ९० हजार), औरंगाबाद जिल्हा कृषी बहुद्देशीय सेवा सहकारी संस्था (१ कोटी ७ लाख ९५ हजार ९४३), आदर्श सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ (६४ लाख ७८ हजार ८२ रुपये), आदर्श डेअरी प्रोडक्ट प्रा. लि. (६ कोटी ३२ हजार ६६ हजार १०२), आदर्श मल्टीमीडिया प्रा. लि. (७ कोटी २८ लाख ४६ हजार ५१५). 

- Advertisment -

ताज्या बातम्या