Monday, June 17, 2024
HomeनाशिकNashik Niphad News : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Nashik Niphad News : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

नाशिक | Nashik

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरणात (Bhavali Dam)
बुडून नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area) गोसावीवाडी येथील पाच जणांचा मृत्यू (Death) झाला होता. त्यानंतर गुरुवार (दि.२३) रोजी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील देव नदी बंधाऱ्यात (Barrage) बुडून दोन चुलत भावांचा मृत्यू झाला होता.

अशातच आता या दोन्ही घटना ताज्या असतानाच निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) निफाड शहरात घरा शेजारील शेततळ्यात (Shet Tale) बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रेमकुमार गोकुळ ढेपले (१६) व प्रतिक गोकुळ ढेपले (१४) असे मृत्यू झालेल्या दोघा भावडांची नावे आहेत.

हे दोघेजण मोटर चालू होत नसल्याने मोटर चालू करण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. यावेळी यातील एकजण मोटर चालू करण्यासाठी पोलावर चढला असता त्याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. यावेळी दुसऱ्याने शेततळ्यात पडलेल्याला वाचविण्याचे प्रयत्न केले असता तोही शेततळ्यात पडला. या दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, यानंतर कुटुंबियांनी तात्काळ दोघांनाही निफाड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर उपसजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केले जाणार आहेत. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या