Wednesday, May 29, 2024
HomeनाशिकNashik News : विजेचा शॉक लागून सख्ख्या भावांचा मृत्यू

Nashik News : विजेचा शॉक लागून सख्ख्या भावांचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

तालुक्यातील तळेगाव काचुर्ली (Talegaon Kachurli) येथे टॉमेटोच्या (Tomato) पिकाला पाणी देण्याच्या नादात दोन सख्ख्या भावांचा विजेचा शॉक लागून ( Electric Shock) मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे….

- Advertisement -

…तर नाशिकच्या माजी महापौरांची होणार चौकशी

याबाबत अधिक माहिती अशी की, तुकाराम पारधी (३०) आणि ज्ञानेश्वर पारधी (२२) असे मृत्यू झालेल्या भांवडांची नावे आहेत. तळेगाव काचुर्ली येथील किकवी नदीपात्रातील (Kikwi River Basin) पाणी कमी झाले म्हणून मोठा भाऊ तुकाराम पारधी हा जलपरी पुढे ढकलण्यास गेला. मात्र, जलपरीत पाण्याचा (Water) प्रवाह उतरलेला असल्याने त्याला जोरदार धक्का बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

…तर कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार; माजी महापौरांचा खुलासा

तर काठावर उभा असलेला लहान भाऊ ज्ञानेश्वरने हा सर्व प्रकार पाहून मोठ्या भावाला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोदेखील विज प्रवाहात सापडला. यावेळी त्यालाही विजेचा शॉक बसल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात (Trimbakeshwar Upazila Hospital) आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. यातील तुकाराम हा विवाहित असून त्याला लहान मुले आहेत. तसेच ज्ञानेश्वर हा अविवाहित होता.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Accident News : टँकर-सुमो गाडीचा भीषण अपघात; १२ जण जागीच ठार

- Advertisment -

ताज्या बातम्या