अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कर्जत येथील खुनाच्या गुन्ह्यातील पसार असलेल्या संशयितासह अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शुभम उर्फ काळ्या, नितीन ऊर्फ आसमानतार्या चव्हाण (रा. कोरेवस्ती, भांबोरा, ता. कर्जत) असे खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अतुल रावसाहेब दातरंगे (रा. टांगेगल्ली, नालेगाव) असे हद्दपार आदेशाचा भंग करणार्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची तपासणी करत असताना अतुल दातरंगे हा हद्दपार असताना लपूनछपून त्याच्या राहते घरी टांगेगल्ली, नालेगाव येथे वास्तव्य करत असताना मिळून आला. त्याला अटक केली आहे. एलसीबीचे दुसरे पथक पसार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना कर्जत येथील खुनाच्या गुन्ह्यातील पसार शुभम चव्हाण हा भांबोरा येथील त्याच्या राहते घरी आला आहे, अशी माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी शुभम उर्फ काळ्या नितीन उर्फ आसमानतार्या चव्हाण याला ताब्यात घेत अटक केली आहे.