Saturday, May 4, 2024
Homeनाशिकधुळे-कुसुंबा मार्गावरील अपघातात दोन ठार

धुळे-कुसुंबा मार्गावरील अपघातात दोन ठार

उमराणे | Umrane

धुळे -कुसुंबा रोडवर होंडा सिटी कारने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

दरम्यान या अपघातात सौदाणे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सुकदेव पवार यांचा मुलगा केतन पवार हा या अपघातात ठार झाला आहे.

काल (दि.२७) दुपारी २ वाजता कंपनीच्या काम करण्यासाठी मित्र निलेश जुगराज पाटील (वय 22) (कुसुम्बा) याला घेऊन खेड गावाकडे घेऊन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या होंडा सिटी कारने मोटारसायकलला धडक दिली. यात डोक्याला मार लागल्याने दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले.

ह्या घटनेची माहिती मिळताच सौदाणे उमराणे परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या