Tuesday, April 7, 2026
HomeनाशिकMalegaon Municipal Election: भाजपच्या दोघा माजी शहराध्यक्षांना बंडखोरी भोवली; वरिष्ठांच्या आदेशान्वये निलंबन

Malegaon Municipal Election: भाजपच्या दोघा माजी शहराध्यक्षांना बंडखोरी भोवली; वरिष्ठांच्या आदेशान्वये निलंबन

मालेगाव | प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या पक्षाच्या दोघा माजी शहराध्यक्षांवर अखेर वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा. नीलेश कचवे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

महानगरपालिका निवडणुकीत भाजपतर्फे २६ जागा लढवण्यात येत आहेत. त्यातील २० जागा हिंदूबहुल पश्चिम भागातील असून सहा जागा मुस्लीमबहुल पूर्व भागातील आहेत. पश्चिम भागातील २० जागांवर भाजप व शिवसेना शिंदे गटामध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. अशा स्थितीत एकेक जागा महत्त्वाची असताना दोन प्रभागांमध्ये पक्षातीलच बंडखोरांचा सामना करावा लागत असल्याने भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisement -

प्रभाग १० मध्ये माजी महानगरप्रमुख नितीन पोफळे हे भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. परंतु पक्षाने या ठिकाणी भाजपचे माजी गटनेते सुनील गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या पोफळे यांनी गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून भाजपचे वरिष्ठ नेते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पोफळे यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी समजूत काढली. मात्र पोफळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत बंडाचा पवित्रा घेतला आहे.

Uday Samant: “मनपाने जागा उपलब्ध करुन दिल्यास…”; तपोवन वृक्षतोडीवर मंत्री उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

व्यापारी आघाडीचे प्रदेश सहसंयोजक पदाची जबाबदारी सद्यस्थितीत पोफळे सांभाळत आहेत. मात्र त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना आज निलंबित करण्यात आले आहे. प्रभाग क्र. नऊमध्ये माजी महानगरप्रमुख विवेक वारुळे यांच्या पत्नी दीपाली वारुळे या उमेदवारीसाठी उत्सुक होत्या. मात्र भाजपने त्यांच्याऐवजी राजश्री गिते यांना तेथे उमेदवारी दिल्याने दीपाली वारुळे यांनीदेखील अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असल्याने विवेक वारुळे यांनादेखील निलंबित करण्यात आले आहे.

पोफळे व वारुळे यांच्या उमेदवारीमुळे भाजपची काहीशी अडचण झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पोफळे यांच्या प्रचार पत्रकांमध्ये चक्क भाजप नेत्यांचे फोटो झळकत असल्याने भाजपचे पदाधिकारी अस्वस्थ झाले होते. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारदेखील करण्यात आली होती. पोफळे व वारुळे यांनी केलेल्या बंडखोरीची जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे यांनी गंभीर दखल घेऊन दोघांवर कारवाई करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी पत्र पाठवून केली होती.

Nashik News: कुंभ पर्वातील अमृत वचननामा म्हणजे लोकाभिमुख धोरण – सुनील केदार

त्यानुसार चव्हाण यांनी कचवे यांनाच दोघांवर कारवाई करण्याची सूचना केली असता त्याची अंमलबजावणी दोघांचे पक्षातून निलंबन करत केली गेली. पक्षात काम करूनही आपल्याला डावलून पक्षनेत्यांनी आपल्यावर अन्याय केल्यामुळे आपण अपक्ष उमेदवारी करत आहे. उद्या निवडून आलो तर भाजपलाच साथ देईल, अशी प्रतिक्रिया पोफळे यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अविनाश शिंदे हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप; अकरा लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik इंदिरानगर भागातील (Indiranagar Area) बापू बंगला परिसरातील प्रसिद्ध 'सुपर ग्राहक बाजार'चे मालक अविनाश शिंदे यांच्या निघृण हत्या आणि लूट प्रकरणाचा...