Friday, February 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : शेततळ्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू

दुर्दैवी : शेततळ्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू

सटाणा | प्रतिनिधी Satana

- Advertisement -

तालुक्यातील देवळाणे येथील रातीर शिवारातील स्वत:चेच शेततळे पाहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींपैकी एकीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने तिला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसरीचा पाण्यात बुडून दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला.शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे देवळाणे व कुपखेडा गावावर शोककळा पसरली आहे.

YouTube video player

कुपखेडा गावातील श्रावणी ठाकरे ही आपल्या आत्त्याच्या गावी देवळाणे येथे आली असता, आत्याची मुलगी ऋतुजा देवरे व श्रावणी ठाकरे या दोघी शेतातील शेततळे पाहण्यासाठी गेल्या असता ऋतुजाचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली. तिला वाचवण्यासाठी श्रावणी गेली असता दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दोघी मुली घराकडे का येत नाही याचा शोध ऋतुजाच्या कुटुंबीयांनी घेतला असता, दोघी शेततळ्यात बुडाल्याचे समजल्या नंतर त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना घटना कळविली. दुर्दैवाने दोघींचा या घटनेत मृत्यू झाला. गावकऱ्यांनी दोराच्या सहाय्याने दोघींना तलावाबाहेर काढले. सटाणा ग्रामीण रूग्णालयात दोघींचे शवविच्छेदन करण्यात आले.

ऋतुजा इयत्ता नववीत तसेच श्रावणी इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. ऋतुजा व श्रावणी एकुलत्या एक मुली असल्याने देवळाणे येथील देवरे व कुपखेडा येथील ठाकरे कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. नामपूर पोलिसांतर्फे पुढील तपास पोलिस करण्यात आहे .

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...